Eve's World Headline Animator

Thursday, August 05, 2010

Long Skirts - The glamorous Fashion (Long Skirts की घागरा?)

लक्ष्य सिनेमातलं 'अगर मैं कहूं...' हे गाणं आठवतयं? त्यातली प्रीती आठवतेय? तिचा तो घेरदार, पायापर्यंत येणारा लाँग स्कर्ट आठवतोय? या स्कर्टची जोरदार क्रेझ सध्या तरुणींमध्ये आहे. अनेक फैशन, हेअर स्टाईल्स, वेशभूषा काळाच्या ओघात मागे पडतात आणि काही वर्षानी नवीन म्हणून त्याच फ़ँशन म्हणुन पुन्हा रूढ़ होतात. लांब हाताचे ब्लाऊज, फुग्याचे ब्लाऊज, साधना कट, छोट्या बाह्यांचे मेगँ ब्लाऊज, बेलबाँटम अशी किती उदाहरणं घेता येतील. थोड्याफार प्रमाणात लाँग स्कर्टच्या फ़ंशनबाबतीतही तसचं घडते.

long skirtराजस्थान, गुजरात, मारवाड़ अशा काही प्रांतामध्ये मोठा घोळदार घागरा वर चोळी हाच स्त्रियांचा मुख्य पेहराव आहे. हे घागरे जड़ असतात. भरपूर घेर असतो. त्या-त्या प्रांताची संस्कृति दाखवणारी चित्र नक्षीकाम, आरसेकाम, त्यावर केलेलं असतं याचं घाग-यामधे थोडेफार बदल होऊं नव्या स्वरूपात, नव्या ढंगात लाँग स्कर्ट या नावाने लोकप्रिय होत आहे असं म्हणायला हरकत नाही.

अर्थातच, या स्कर्टमध्ये खुप वेगळे, आधुनिक काळाला साजेसे बदल करण्यात आले आहेत. क्रिंकलेड स्कर्ट, लेअर्ड स्कर्ट, एलाईन स्कर्ट असे स्कर्टचे अनेक प्रकार आहेत. आता ब्रान्डेड कपड्यांमधे हे स्कर्ट येऊ घातले आहेत. साहजिकच त्यांच्या किमती जास्त आहेत. पण फ़ँशन ती फ़ँशन, करायला तर हवीच. नाही का?